Thursday, 21 February 2013

सूर्यनमस्कारातून मिळाला ऊर्जेचा मंत्र

५१ हजार विद्याथ्र्यांचा एकाचवेळी सूर्यनमस्कार

यशवंत स्टेडियम येथील सूर्यनमस्काराचे दृश्य

स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीद्वारा स्वामी विवेकानंदांच्या१५० व्या जयंतीनिमित्त आज सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान शहरभर सामूहिकसूर्यनमस्कार महायज्ञ उत्साहात पार पडला. शहरात विविध २९ ठिकाणी २२०विद्यालयांच्या ५१ हजारांवर विद्याथ्र्यांनी एकाचवेळी सूर्यनमस्कार केला.इतक्या मोठ्या प्रमाणात सूर्यनमस्कार सादर करण्याची ही पहिलीच वेळअसावी. यात ५१ हजार मुलामुलींनी प्रत्येकी १३ सूर्यनमस्कार या प्रमाणे ६लाख ५० हजार सूर्यनमस्कार घातले.